Join us

IPL 2023, LSG vs DC, Toss Update: वॉर्नर-राहुल भीडणार; दिल्लीनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या Playing XI

IPL 2023, LSG vs DC, Live: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स सामन्याचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 19:25 IST

Open in App

IPL 2023, LSG vs DC, Live: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तिसरा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दिल्लीच्या संघापुढे केएल राहुलचे नेतृत्व पणाला लागले आहे. सामन्याची नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सनं जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडे दिल्लीच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना मिचेल मार्श याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. तर पृथ्वी शॉ, सरफराज खान, यश धूल, अक्षर पटेल यांच्याही कामगिरीकडे लक्ष असणार आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंट्स संघानं गेल्या आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पहिल्याच पर्वात लखनौचा संघ प्ले-ऑफपर्यंत पोहोचला होता. कर्णधार केएल राहुलकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. घरच्या मैदानात राहुल, काइल मायर्स, दीपक हुड्डा यांच्याकडून मोठी खेळी पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच युवा खेळाडू आवेश खान, जयदेव उनाडकट, कुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, प्रेरक मांकड यांच्याकडे लक्ष असणार आहे. 

असे आहेत दोन्ही संघ...

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्स
Open in App