Join us

पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा

कोलकाताविरुद्ध १०६ धावांनी झालेला पराभव अमान्य आणि निराशादायी असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली.  दिल्लीविरुद्ध कोलकाताने ७ बाद २७२ पर्यंत मजल गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 06:01 IST

Open in App

विशाखापट्टणम : कोलकाताविरुद्ध १०६ धावांनी झालेला पराभव अमान्य आणि निराशादायी असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली.  दिल्लीविरुद्ध कोलकाताने ७ बाद २७२ पर्यंत मजल गाठली.  पण, दिल्ली संघ १७.२ षटकांत १६६ धावांत गारद झाला.

पराभवाची समीक्षा करणे कठीण असल्याचे सांगून खेळाडूंची कानउघाडणी करीत पाँटिंग म्हणाले, ‘इतक्या धावा देणे मला पटत नाही.  १७ वाइड चेंडू टाकणाऱ्या आमच्या गोलंदाजांनी तब्बल दोन तास घेतले. सामन्यात घडलेल्या बऱ्याच गोष्टी मला मान्य नाहीत.  संघाच्या बैठकीत त्यावर चर्चा करू.  सुधारणा करण्याचा प्रयत्न होणार आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतील अपयश या सर्व बाबींवर मोकळेपणाने तोडगा काढण्याची गरज आहे.’

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४