शेवट गोड करण्याचा निर्धार, आज निर्णायक टी-२० लढत

तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात शनिवारी टीम इंडिया द. आफ्रिकेवर विजयासह निरोप घेण्यास सज्ज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:15 AM2018-02-24T03:15:42+5:302018-02-24T03:15:42+5:30

whatsapp join usJoin us
Decision to sweeten the finishing touches, today, the decisive T-20 match | शेवट गोड करण्याचा निर्धार, आज निर्णायक टी-२० लढत

शेवट गोड करण्याचा निर्धार, आज निर्णायक टी-२० लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केपटाऊन : तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात शनिवारी टीम इंडिया द. आफ्रिकेवर विजयासह निरोप घेण्यास सज्ज आहे. मागच्या सामन्यात झालेल्या पराभवातून सावरलेल्या विराट कोहली अ‍ॅन्ड कंपनी लांबलचक चाललेल्या दौºयात आणखी एक मालिका खिशात घालण्याच्या निर्धारानेच उतरणार आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ असे बरोबरीत आहेत. जोहान्सबर्गचा पहिला सामना भारताने २८ धावांनी जिंकला तर द. आफ्रिकेने दुसºया सामन्यात सहा गड्यांनी विजयासह परतफेड केली.
भारताने न्यूलॅन्डस्मध्ये कधीही टी-२० सामना खेळला नाही. द. आफ्रिकेने या मैदानावर आठ पैकी पाच टी-२० सामने गमावले. २००७ च्या विश्वचषकात यजमानांनी येथे दोन सामने जिंकले. द्विपक्षीय मालिकेत २०१६ मध्ये इंग्लंडवर एकमेव विजय नोंदविला.
मागच्या सामन्यात हंगामी कर्णधार जेपी ड्यूमिनी याने यशस्वी नेतृत्व करीत डावपेच आखले होते. या सामन्यात देखील विजयी संघ कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह पोटदुखीमुळे खेळू शकला नव्हता. आजही तो खेळेलच याची खात्री नाही.

सामना रात्री ९.३० पासून

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रीका : जेपी ड्यूमिनी (कर्णधार ), फरहान बेहारदीन, ज्युनियर डाला, रिजा हेंड्रिक्स, क्रिस्टियान जोंकर, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, अ‍ॅरोन फांगिसो, एंडिले पी, तबरेज शम्सी, जे. जे. स्मट्स.

Web Title: Decision to sweeten the finishing touches, today, the decisive T-20 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.