Join us

DDCA Elections 2018: वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची डीडीसीएच्या अध्यक्षपदी निवड 

इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 13:47 IST

Open in App

नवी दिल्ली- इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रजत शर्माला बाजूनं 45.40 टक्के मतं पडली आहेत. तर राकेशकुमार बन्सल यांची डीडीसीएच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बन्सल यांना या निवडणुकीत 48.87 टक्के मतं मिळाली आहेत.डीडीसीए असोसिएशन कार्यकारिणीनं 27 ते 30 जून रोजी निवडणूक घेतली होती. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. त्याच वेळी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी विनोद तिहारा, तर खजिनदार म्हणून ओमप्रकाश शर्मा यांची निवड झाली आहे.राजन मचंदा सहसचिव, रेनू खन्ना महिला संचालक म्हणून निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीत अपूर्व जैन, अलोक मित्तल, नितीन गुप्ता, शिवनंदन शर्मा, सीए सुधीरकुमार अग्रवाल यांची निवड झाली आहे. रजत शर्मानं निवड झाल्यानंतर त्यानं मतदारांचे आभार मानले आहेत, तसेच डीडीसीएच्या कारभारात लवकरच पारदर्शका आणण्याचं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनंही रजत शर्मा यांनी दिली आहे.