Join us  

DC vs MI Latest News : मुंबई इंडियन्स Play Offमध्ये 'या' तारखेला खेळणार; आजच्या विजयानं शुभवार्ता आणली!

DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 7:05 PM

Open in App

DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला. या विजयासह मुंबई इंडियन्सनं ( MI) गुणतक्त्यातील अव्वल दोन क्रमांकामधील एक स्थान पक्कं केलं आहे. 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. पृथ्वी शॉचा निराशाजनक कामगिरीचा कित्ता याही सामन्यात कामय राहिला. बोल्टनं त्याला १० धावांवर बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ११व्या षटकात क्विंटन डी'कॉकनं चपळ स्टम्पिंग करून दिल्लीला मोठा धक्का दिला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस ( २), रिषफ पंत ( २१) हे जसप्रीत बुमराहच्या एकाच षटकात माघारी परतले. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत २१ धावांत ३ विकेट घेतल्या. बुमराहनं १७ धावांत ३ विकेट घेत दिल्लीला ९ बाद ११० धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. 

इशान किशन-क्विंटन डी'कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. क्विंटन डी'कॉक २६ धावांवर माघारी परतला. इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईनं १४.२ षटकांत लक्ष्य पार केले. किशन ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत. 

१८ गुणांसह मुंबई इंडियन्सनं अव्वल स्थान पक्कं केलं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात. तरीही मुंबई इंडियन्स अव्वल दोन स्थानांपैकी एकावर कायम राहून क्वालिफायर १ साठी पात्र ठरतो. त्यानुसार मुंबई इंडियन्सला दुबईत क्वारलिफायर १ सामना खेळावा लागेल.

प्ले ऑफचे वेळापत्रकक्वालिफायर १ - ५ नोव्हेंबर ( दुबई) - मुंबई इंडियन्स वि. एलिमिनेटर - ६ नोव्हेंबर ( अबु धाबी)क्वालिफायर २ - ८ नोव्हेंबर ( अबु धाबी)अंतिम सामना - १० नोव्हेंबर ( दुबई) 

२०११मध्ये प्ले ऑफ आणलं गेलं आणि तेव्हापासून टॉप टूमध्ये मुंबई इंडियन्सनं चारवेळा स्थान पक्कं केलं. त्या चारही वेळेस मुबंईनं जेतेपद पटकावलं.    

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स