Join us  

Super Overचा थरार, दिल्ली कॅपिटल्सचा KXIPवर नाट्यमय विजय

DC vs KXIP Latest News : मार्कस स्टॉयनिसनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवली कमाल

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 11:47 PM

Open in App
ठळक मुद्देमयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या. सुपर ओव्हरमधील सर्वात कमी टारगेट तीन धावा

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) खेळवला गेला.  मोहम्मद शमी ( Mohammed shami) ने सुरेख गोलंदाजी करून DCच्या धावांवर लगाम लावली. पण, मार्कन स्टॉयनिसने तुफान फटकेबाजी करून KXIPच्या गोलंदाजाना हतबल केले. धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी निराश केले. मात्र, मयांक अग्रवालनं संयमी आणि दमदार खेळ करताना पंजाबला विजयासमीप आणले. पण, हा सामना बरोबरीत सुटल्यानं, सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्लीनं सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.  IPL 2020 Live Updates, Click here

शमीनं ( Mohammed Shami) टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिखर धवनला भोपळाही न फोडता माघारी जावं लागलं. शमीनं चौथ्या षटकात DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिमरोन हेटमायर यांना माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या 3 बाद 23 धावा होत्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. पण, युवा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रवी बिश्नोईनं  ( Ravi Bishnoi) ही सेट जोडी तोडली. त्यानं पंतला त्रिफळाचीत केले. IPL 2020 Live Updates, Click here

 

KL Rahulने शमीला पुन्हा पाचारण केले आणि त्यानं त्याचा विश्वास सार्थ ठरवला. Shamiने अय्यरला बाद केले. शमीने षटकांत 15 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. IPLमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी त्यानं 2019मध्ये MI विरुद्ध 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणवीर रवी बिश्नोईनंही 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानंतर अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसने ( Marcus Stoinis ) फटकेबाजी करून DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  मार्कसनं 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 53 धावा केल्या. दिल्लीनं 20 षटकांत 8 बाद 157 धावा केल्या. IPL 2020 Live Updates, Click here

आर अश्विननं ( Ashwin) KXIPला दिले धक्के, पण दुखापतीमुळे मैदान सोडले.KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. निकोलस पुरनला सहजतेनं त्यानं त्रिफळाचीत केलं. करुण नायरही त्याच्या गोलंदाजीवर फसला. ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु कागिसो रबाडानं त्याला बाद केले. अश्विनने सहाव्या षटकात KXIPला दोन धक्के दिले, परंतु अखेरच्या चेंडूवर एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले. त्याच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदना होताना पाहायला मिळाल्या. त्यानं तसेच मैदान सोडले. IPL 2020 Live Updates, Click here

मयांक अग्रवालनं खिंड लढवलीकृष्णप्पा गोवथम आणि मयांक यांनी सहाव्या विकेटसाठी साजेशी भागीदारी केली. 16व्या षटकात कागिसो रबाडानं ही जोडी तोडली. गोवथम 20 धावांवर माघारी परतला. मयांकनं एका बाजूनं संयमी खेळी करताना वैयक्तिक अर्धशतकासह पंजाबच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. मोहित शर्मानं टाकलेल्या 18 व्या षटकात 17 धावा चोपल्या. मयांकची ही फटकेबाजी 19व्या षटकातही कायम राहिली. DCचा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याचा झेल सोडला. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला असता. 6 चेंडूंत 13 धावांची गरज असताना मयांकनं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या. आयपीएलमधील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी त्याची  सर्वौच्च खेळी नाबाद 69 धावांची होती. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही. IPL 2020 Live Updates, Click here

सुपर ओव्हरचा थरार

  • कागिसो रबाडाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावा
  • दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल बाद
  • तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरण बाद
  • दोन विकेट्स गेल्यानं दिल्लीसमोर विजयासाठी 3 धावा
  • मोहम्मद शमीचा पहिला चेंडू निर्धाव
  • शमीच्या दुसरा चेंडू Wide
  • रिषभ पंतच्या दोन धावा 
  • आयपीएलचे सुपर ओव्हर

    1-2009- राजस्थान वीजयी2- 2010- पंजाब विजयी3- 2013- हैदराबाद विजयी4- 2013- बंगलोर विजयी5- 2014- राजस्थान विजयी6- 2015- पंजाब वीजयी7- 2017- मुंबई विजयी8- 2019- दिल्ली विजयी9- 2019- मुंबई विजयी

  • सुपर ओव्हरमधील सर्वात कमी टारगेट तीन धावा

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्स