Rishabh Pant's Girlfriend Isha Negi Spotted In CSK vs DC Match: आयपीएल २०२२ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतची (Rishabh Pant) गर्लफ्रेन्ड ईशा नेगी Isha Negi) मैदानावर प्रत्येक सामन्यात त्याला साथ देताना दिसत आहे. रविवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामन्यात ईशा नेगीही मैदानात पोहोचली. या सामन्यात रिषभ पंतची फटकेबाजी पाहून इशा नेगीचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या सामन्यापूर्वीही ईशा नेगी रिषभ पंतची बहीण साक्षी पंतसोबत सामना पाहण्यासाठी आली होती. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने 11 चेंडूत 21 धावा केल्या. या डावात त्यानं १९०.९१ च्या सरासरीनं धावा करताना ४ चौकारही लागले. रिषभ पंतची ही फटकेबाजी पाहून प्रेक्षकांत बसलेली रिषभ पंतची गर्लफ्रेन्ड ईशा नेगी आनंदाने नाचताना दिसली. ईशा नेगीची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
रिषभ पंत आणि ईशा नेगी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रिषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी इंटिरियर डिझायनर आहे. ईशा नेगी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी जेव्हा ईशा नेगीचा वाढदिवस होता, तेव्हा रिषभने तिच्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. उत्तरात ईशा नेगीनेही रिषभ पंतला आय लव्ह यू असं म्हणत रिप्लाय दिला होता. ती अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटोस शेअरही करत असते.