Join us  

थेट मैदानात उतरुन खेळण्याचे दिवस आले - विराट कोहली

‘क्रिकेटपटूंसाठी आता तो दिवस दूर नसेल, जेव्हा थेट स्टेडियमवर उतरुन खेळावे लागेल,’ असे मत व्यक्त करत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:58 AM

Open in App

आॅकलंड : ‘क्रिकेटपटूंसाठी आता तो दिवस दूर नसेल, जेव्हा थेट स्टेडियमवर उतरुन खेळावे लागेल,’ असे मत व्यक्त करत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी भारतीय संघ यजमान न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी२० सामना खेळले. पाच दिवसआधीच आॅस्टेÑलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर लगेच न्यूझीलंडविरुद्ध खेळावे लागणार असल्याने कोहली त्रस्त झाला.कोहलीने म्हटले की, ‘आता आम्ही अशा दिवसाकडे पोहचत आहोत, जेव्हा थेट स्टेडियममध्येच लँडिंग करुन खेळावे लागेल. वेळापत्रक खूप व्यस्त झाले असून इतका मोठा प्रवास करुन वेगळ्या टाईम झोनच्या देशात परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे नसते. भविष्यात या गोष्टींचाही विचार होण्याचा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेच सातत्याने खेळावे लागते.’कर्णधारपद सोडण्यास तयारआॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केन विलियम्सनने गुरुवारी संकेत दिले की, तो संघाच्या हितासाठी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे. विलियम्सन म्हणाला, ‘संघासाठी सर्वोत्तम गोष्टींचा मी नेहमी विचार करतो. जर संघहितासाठी नेतृत्त्व सोडणे योग्य असेल, तर त्यासाठी माझी तयारी आहे. संघाला योग्य दिशेने घेऊन जाणाऱ्या प्रत्येक बाबीसाठी मी तयार आहे.’ (वृत्तसंस्था)‘वचपा काढण्याचा विचार नाही’मालिकेत वचपा काढण्याचा विचार नसल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले. भारताला न्यूझीलंडने विश्वचषक उपांत्य लढतीत नमवले होते. कोहली म्हणाला, ‘न्यूझीलंड इतका चांगला संघ आहे की, वचपा काढण्याचा विचारच येत नाही. आम्ही केवळ मैदानावर प्रतिस्पर्धी आहोत. न्यूझीलंड संघ क्रिकेटचा चांगला दूत आहे. ते प्रत्येक लढतीत चांगला खेळ करण्यास उत्सुक असतात. मर्यादा ओलांडणारे वर्तन त्यांच्याकडून कधीच होत नाही.’

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ