Join us

आजच्या दिवशी झाली होती क्रिकेटच्या महानायकाच्या अखेराची सुरुवात

सचिनने जेव्हा वाकून खेळपट्टीला नमस्कार केला तेव्हा चाहत्यांच्या डोळे पाण्याने भरले आणि त्या पाणावलेल्या डोळ्यात सचिन विरुन गेला. पण त्यांच्या मनाच्या देव्हाऱ्यात मात्र सचिनची छबी कायम असेल, हे मात्र नक्की.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:44 IST

Open in App
ठळक मुद्देसामना संपल्यावर सचिनने जेव्हा मैदानात आपणे निरोपाचे भाषण सुरु केले. तेव्हा साऱ्यांचे डोळे पाणावले होते.चाहत्यांनी त्यावेळी सचिन... सचिन... हा एकच गजर करत आपल्या महानायकाला निरोप दिला होता.चाहत्यांच्या मनाच्या देव्हाऱ्यात मात्र सचिनची छबी कायम असेल, हे मात्र नक्की.

मुंबई : क्रिकेट विश्वाचा महानायक ठरलेल्या सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या सामन्याला आजच्या दिवशी सुरुवात झाली होती, ते साल होते 2013. वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडेवर हा सामना झाला होता. भारताने हा सामना जिंकत सचिनला खास भेट दिली होती. पण या सामन्यात सचिनला शतक झळकावता आले नाही, याची बोच त्याच्या चाहत्यांनाही लागली होती.

सामना संपल्यावर सचिनने जेव्हा मैदानात आपणे निरोपाचे भाषण सुरु केले. तेव्हा साऱ्यांचे डोळे पाणावले होते. चाहत्यांनी त्यावेळी सचिन... सचिन... हा एकच गजर करत आपल्या महानायकाला निरोप दिला होता. भारतीय खेळाडूंना सचिनला खांद्यावर घेऊन पूर्ण वानखेडे स्टेडियम फिरवलं होतं. सारं काही संपलं होतं. खेळाडू पेव्हेलियनच्या दिशेने निघाले होते. पण सचिन मैदानातच थांबला होता. तिथून चालत तो वानखेडेच्या खेळपट्टीजवळ आला आणि त्याने जेव्हा वाकून खेळपट्टीला नमस्कार केला तेव्हा चाहत्यांच्या डोळे पाण्याने भरले आणि त्या पाणावलेल्या डोळ्यात सचिन विरुन गेला. पण त्यांच्या मनाच्या देव्हाऱ्यात मात्र सचिनची छबी कायम असेल, हे मात्र नक्की.

बीसीसीआयने देखील सचिनला कुर्निसात केला आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरबीसीसीआय