Join us  

डेव्हिड वॉर्नरची 'शाहरुख' स्टाईल एन्ट्री! मॅच खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानावर होणार लँडिंग 

कसोटी क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) शुक्रवारी बॉलिवूड स्टाईल एन्ट्री मारणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 3:10 PM

Open in App

कसोटी क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) शुक्रवारी सिडनी सिक्सर्सविरुद्ध सिडनी थंडरकडून खेळण्यासाठी SCG मैदानावर थेट हेलिकॉप्टरने एन्ट्री घेणार आहे. त्याच्या भावाच्या लग्नातून तो मॅच खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. वॉर्नर हा भारतीय चित्रपटांचा जबरदस्त फॅन आहे आणि त्याने वेळोवेळी टिक टॉकच्या माध्यमातून ते सिद्धही केले आहे. आता त्याची एन्ट्री ही कभी खुशी कभी गममधील शाहरुख खान याच्यासारखी असेल, अशी चर्चा नेटिझन्स करून लागले आहेत.

क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानाशेजारी असलेल्या एलियान्स स्टेडियमवर तो सुरुवातीला दाखल होणार होता. परंतु, आता तो जिथे शेवटची कसोटी खेळला तेथे Thanks Dave जिथे लिहिले आहे तिथे हेलिकॅप्टरने लँडिंग करणार आहे. तो हंटर व्हॅलीमध्ये लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर, सेसनॉक विमानतळावर पोहोचणार आहे आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास मैदानावर पोहोचणार आहे. पण, हवामान चांगले असल्यास त्याला हे करता येणार आहे. 

थंडर क्विक गुरिंदर संधू म्हणाला, "तो आमच्यासाठी येऊन खेळण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. आम्हाला तो इथे असणं खूप आवडतं. गेल्या वर्षी तो आमच्यासाठी खूप छान खेळला होता, कदाचित त्याने जितक्या धावा केल्या असतील तितक्या धावा केल्या नसतील पण त्याचे खेळणे हे महत्त्वाचे आहे. तो संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सर्व चाहत्यांना त्याच्या क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटता येईल."

''ही एन्ट्री हॉलिवूड सारखी असेल,''असे सिडनी सिक्सर्सचा सीन एबॉट गमतीने म्हणाला. तो म्हणाला, "मला आनंद आहे की ते हे घडवून आणत आहेत. कारण, असे वाटते की देशातील प्रत्येकजण जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये पाहायचे आहे आणि मी त्याच्या विरुद्ध येण्यास उत्सुक आहे."

मागील पर्वात थंडर्सनी मोठी रक्कम मोजून वॉर्नरसोबत दोन वर्षांचा करार केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट अजूनही खेळावे यासाठी प्रयत्न केले. त्याने पुढील हंगामात ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो समालोचक म्हणून पदार्पण करणार आहे.   

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरबिग बॅश लीगऑफ द फिल्ड