Join us  

डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी मानले भारतीय विद्यार्थ्यांचे आभार; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

ऑस्ट्रेलियातही कोरोना रुग्णांची संख्या 7289 इतकी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 1:40 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 76 लाख 265 इतकी झाली आहे. त्यापैकी 38 लाख 43,996 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 4 लाख 23,901 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऑस्ट्रेलियातही कोरोना रुग्णांची संख्या 7289 इतकी आहे. त्यापैकी 102 जणांचे निधन झाले आहे, तर 6781 रुग्ण बरे झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील रुग्णांना बरे करण्यासाठी भारताची लेक दिवसरात्र मेहनत घेत आहे. येथील वोलोंगोंग येथे भारतीय नर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. शॅरोन वेर्घीस असे तिचे नाव आहे. तिचे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने कौतुक केले आहे, तर डेव्हिड वॉर्नरने श्रेयस शेठचे आभार मानले.

युनायटेड नर्स असोसिएशननंही शॅरोनचं कौतुक केलं... त्यांनी सांगितलं की 20 लाख नोंदणीकृत नर्सेसमध्ये 15 लाख नर्सेस या केरळ येथील आहेत. ''शॅरोन तुझ्या निस्वार्थी सेवेचे कौतुक. सर्व ऑस्ट्रेलियन, सर्व भारतीय आणि विशेषतः कुटुंबीयाना तुझा अभिमान वाटत आहे. अभिनंदन आणि समाजसेवेचं काम असंच सुरू राहूदे. या कठीण काळात आपण सर्व एकजुटीनं लढू,''असं गिलख्रिस्ट म्हणाला.  

पाहा व्हिडीओ...

वॉर्नरनेही भारताच्या श्रेयस शेठ याचे आभार मानले. श्रेयस क्विन्सलँड येथे मास्टर्स इन कॉम्प्यूटर सायन्स याचा अभ्यास करत आहे. वॉर्नर म्हणाला,''नमस्ते. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यात मदत करणाऱ्या श्रेयस शेठचे मी आभार मानतो. श्रेयस येथील क्विन्सलँड विद्यापीठात शिकत आहे आणि तो येथील गरजू विद्यार्थ्यांना जेवण पोहोचवण्याचे काम करत आहे. तुझ्या आईला आणि भारतीयांना तुझा अभिमान वाटतोय.'' 

पाहा व्हिडीओ..

डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला 

आता Wide बॉलवर मिळणार फ्री हिट; ट्वेंटी-20 सामन्यात दोन पॉवर प्ले!

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

पाकिस्तानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना 'राजा'सारखी वागणूक देतो; वर्णद्वेषाच्या मुद्द्यात PSLमालकाची उडी

 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरकोरोना वायरस बातम्या