Join us  

बाबो... ऑसी फलंदाजानं १५ चेंडूंत झळकावलं ट्वेंटी-20त अर्धशतक; ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला

तुफान फटकेबाजी

By स्वदेश घाणेकर | Published: December 20, 2020 4:15 PM

Open in App

बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात डॅन ख्रिस्टियनच्या (Dan Christian ) फटकेबाजीनं रविवारी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. सिडनी सिक्सर्स ( Sydney Sixers) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस्टियननं अॅडलेड स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेताना १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर सिक्सर्स संघानं ५ बाद १७७ धावांचे आव्हान उभे केले. BBL इतिहासातिल हे दुसरे जलद अर्धशतक ठरले.

सिडनी सिक्सर्सचे तीन फलंदाज ५८ धावांवर माघारी परतले असताना ख्रिस्टियन फलंदाजीला आला. कर्णधार डॅनिएल ह्युजेससह त्यानं संघाचा डाव सावरला. ख्रिस्टियननं १५ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं, परंतु १६व्या षटकात तो माघारी परतला. ह्युजेस ४६ धावांवर नाबाद राहिला. 

बीग बॅश लीगमध्ये ख्रिस गेलनं २०१५मध्ये मेलबर्न्स संघाचे प्रतिनिधित्व करताना १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते आणि त्याचा हा विक्रम आजही कायम आहे. त्यानंतर ख्रिस्टियनचा क्रमांक येतो. टॉम बँटननं मागच्या पर्वात १६ चेंडूंत, तर बेन कटिंगनं २०१८मध्ये १७ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली होती. 

टॅग्स :बिग बॅश लीगआॅस्ट्रेलिया