Join us  

दालमिया मैदानाबाहेरचे; कोहली मैदानातील ‘हिरो’ - कपिल देव

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानातील हिरो आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया हे मैदानाबाहेरचे हिरो होते, या शब्दात माजी कर्णधार कपिल देव यांनी दालमियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:34 AM

Open in App

कोलकाता: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानातील हिरो आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया हे मैदानाबाहेरचे हिरो होते, या शब्दात माजी कर्णधार कपिल देव यांनी दालमियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.ते म्हणाले,‘ कोहलीकडे पाहताना फिटनेसच्या बळावर काही गोष्टी बदलण्याची ताकद कोहलीत आहे. दालमिया यांनी स्वत:च्या युक्तीमुळे भारतीय क्रिकेटचे चित्र बदलले. स्वत:वर विश्वास ठेवल्यास सर्वोत्कृष्ट गोष्टी आत्मसात करता येतात, हे दालमिया यांनी सिद्ध केले. दालमिया स्मृती चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी भारत आणि श्रीलंका संघातील खेळाडूंसोबतच लंका बोर्डाचे अध्यक्ष तिलंगा सुमतीपाला आणि माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांची उपस्थिती होती. कपिल पुढे म्हणाले,‘आमच्याकडे दोन नायक आहेत. एक मैदानाबाहेर आणि एक मैदानातील नायक. क्रिकेटपटूंना आज चांगले दिवस आले दालमियांमुळेच.आधी आम्ही आॅस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंसारखे वेतन कधी मिळेल याचा विचार करायचो. आज ते खेळाडू भारतीयांसारखे वेतन कधी मिळेल याचा विचार करतात. १९८७ आणि १९९६ च्या विश्वचषक आयोजनाने त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणली.जगातील सर्वांत श्रीमंत बोर्ड बनविण्यात मोलाची भूुमिका बजावली. क्रिकेटपटूंचे करियर ८-१० वर्षांचे असते, याची त्यांना जाणीव होती. प्रत्येकजण सचिनसारखे २० वर्षे खेळू शकत नाही. खेळाडूंकडे पैसा हवा हे त्यांना कळायचे. करिअरदरम्यान पैसा कसा येईल, याचा सतत विचार करायचे. ते उत्कृष्ट वक्ते नव्हते, पण हुशार संघटक होते. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीपोटी दालमिया हे प्रत्येक क्रिकेटपटूचे नायक ठरतात.’यावेळी सुमतीपाला यांनीही दालमिया यांच्या कार्याची प्रशंसा करीत मुरलीधरनच्या संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल आभार मानले.खरी परीक्षा द. आफ्रिकेत: अझहरभारताची खरी परीक्षा द. आफ्रिका दौºयात होईल, असे माजी कर्णधार अझहरुद्दीन याने म्हटले आहे. लंकेविरुद्ध मालिका अटीतटीची होईलच पण खरी परीक्षा द. आफ्रिकेत होणार असल्याचे सांगून विराटच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो पुढे जाऊन नेतृत्व करतो हे अद्भूत आहे, असे अझहर म्हणाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :कपिल देवविराट कोहलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ