नागपूर : दक्षिण आफ्रिका दौ-यात अनुकूल निकाल मिळवण्यासाठी संघातील खेळाडूंना आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्ध डावाने विजय मिळवल्यानंतर तो बोलत होता.
कोहली म्हणाला, ‘मी आपल्या शैलीने फलंदाजी करण्यास उत्सुक होतो. जलद धावा फटकावत गोलंदाजांना अधिक वेळ देण्यास प्रयत्नशील होतो. विदेशातही आम्हाला असाच पवित्रा कायम राखावा लागेल. मी नेहमी मोठी खेळी करीत कामगिरीत सुधारणा करण्यास प्रयत्नशील असतो.’ विराटने चमकदार पुनरागमन करणाºया मुरली विजय व रोहित शर्मासह कामगिरीत सातत्य राखणाºया चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचा उल्लेख केला. गोलंदाजांची प्रशंसा करताना विराट म्हणाला, ‘गेल्या काही महिन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने भारतातर्फे बरेच सामने खेळले आहेत. ईशांत शर्मा, मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. पण, स्थानिक प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी बरीच गोलंदाजी केली आहे.’
आमच्यासाठी नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले. दुर्दैवाने पहिल्या दिवसापासून यजमान संघाने वर्चस्व गाजवले. फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. भारताविरुद्ध जिंकण्यासाठी किंवा पाच दिवसांपर्यंत लढत देण्यासाठी किमान ३५० धावा आवश्यक आहे.
-दिनेश चांदीमल, कर्णधार श्रीलंका
पुन्हा एकदा उभे राहता आल्यामुळे नशीबवान समजतो : रोहित
पुन्हा एकदा पायावर उभे राहता आल्यामुळे स्वत:ला नशीबवान समजतो, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेविरुद्ध दुसºया कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाºया रोहित शर्माने व्यक्त केली. सोमवारी श्रीलंकेविरुद्ध एक डाव २३९ धावांनी विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, ‘जांघेला झालेल्या दुखापतीतून सावरल्यामुळे समाधान झाले. वर्तमानामध्ये जगण्याचा आनंद घेत असून भूतकाळाबाबत विचार करीत नाही. भूतकाळात काय घडले याचा विचार करीत नाही.’
खेळाडूंना लाज वाटायला हवी : पोथास
भारताविरुद्ध दुसºया कसोटी सामन्यात एक डाव २३९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रीलंका संघाचे प्रभारी प्रशिक्षक निक पोथास खेळाडूंवर उखडले. लाज वाटायला हवी, अशा शब्दांत पोथास यांनी आपली निराशा व्यक्त केली.
पोथास म्हणाले, ‘अँजेलो मॅथ्यूजसारखे काही सिनिअर खेळाडू योजनाबद्ध खेळ करण्यात अपयशी ठरले. त्यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.’ दोन्ही डाव झटपट संपुष्टात आल्याबाबत बोलताना पोथास म्हणाले, ‘ही निराशाजनक व लाजिरवाणी बाब आहे. खेळाडूंना आपल्या कामगिरीची लाज
वाटायला हवी.