Join us

'भारतात फ्रीडम नाही, खूपच बंधन', अब्दुल रज्जाकचा दावा, पाकिस्तानच्या अपयशामागचे अजब कारण 

आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या पाकिस्तान संघाचे प्रत्येक शहरात जंगी स्वागत करण्यात आले .

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:55 IST

Open in App

आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या पाकिस्तान संघाचे प्रत्येक शहरात जंगी स्वागत करण्यात आले . हैदराबादपासून कोलकाता, पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान सर्वत्र प्रेम मिळाले. पण पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाकने ( Abdul Razzaq ) आता भारतावर मोठा आरोप केला आहे.

अब्दुल रज्जाक एका स्पोर्ट्स चॅनलवर म्हणाला की, भारतात स्वातंत्र्य नाही. हॉटेलच्या बाहेरही जाता येत नाही. खेळाडू नेहमी हॉटेलमध्ये अडकलेले. भारतात सुरक्षा अतिशय कडक आहे. खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी स्वातंत्र्य हवे. जर त्याला पुरेसे स्वातंत्र्य मिळाले नाही तर खेळाडूला त्याची सर्वोत्तम कामगिरी करता येत नाही.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत ८ सामन्यांत चार विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. पाकिस्तानला शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय मिळवावा लागेल, परंतु त्याआधी न्यूझीलंडच्या पराभवाची प्रार्थना आवश्यक आहे.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानऑफ द फिल्ड