Join us  

कमॉन इंडिया... खेळाडूंसाठी भारत आर्मीचे खास चीअर्स

थेट लंडनहून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 5:34 AM

Open in App

अयाझ मेमन

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये नक्कीच मोठी लढत असते. मात्र भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील लढतही काही कमी मानली जात नाही. २००१ मध्ये ईडन गार्डनवर लक्ष्मण आणि द्रविड यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने फॉलोआॅननंतरही या सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला होता आणि त्यानंतर या दोन्ही देशांतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली. भारताने आॅस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला प्रत्येक वेळी मोठे आव्हान दिले. त्यामुळे या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या सामन्याची तिकिटे बुकिंग सुरू झाल्यानंतर एका दिवसातच विकली गेली.

अनिल कुंबळे यांनी या दोन्ही देशांतील स्पर्धेबाबत सांगितले की, ‘या दोन्ही संघांचे क्रिकेट कौशल्य उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे या दोन्ही संघांतील खेळाडू सामना जिंकण्याच्या ईर्षेने खेळतात. त्यांच्यात स्पर्धात्मक भावना आहे. हीच बाब चाहत्यांनादेखील लागू पडते. पाकिस्तानविरुद्ध भावनेचे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध हीच बाब क्रिकेटमधील वर्चस्वाची आहे.’भारताचे समर्थक हे जगभरातून आलेले आहेत. या सामन्याच्या सुरुवातीला मी बऱ्याच लोकांना भेटलो. ते कॅनडा, यूएई, केनिया अगदी मेक्सिकोतूनदेखील आले होते. मेक्सिकोतून आलेल्या क्रिकेट चाहत्याने सांगितले की,‘आम्ही जगभर जेथे जातो, तेथे तीन गोष्टी घेऊन जातो, त्या म्हणजे अन्न, चित्रपट आणि गाणी, क्रिकेट हे होय. हे सर्वत्रच घडते. क्रिकेट स्पर्धा आयोजकांसाठी हे उत्तम असते. भारताच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याची तिकिटेही विकली गेली आहेत. ओव्हलच्या बाहेर हेदेखील सांगितले गेले की, ‘भारताशिवाय क्रिकेट व्यवसाय चांगला होऊ शकत नाही.’

भारताचे समर्थक सर्वच प्रकारात येतात. चाहत्यांचा एक समूह असलेला ‘भारत आर्मी’ सर्वच सामन्यांना उपस्थित असतो. सामन्यापूर्वी ओव्हलमध्ये त्यांच्याकडे खेळाडूंचे स्केचेस होते. भारतात क्रिकेट हा सर्वव्यापी खेळ आहे. साऊथम्पटनमध्ये उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानीदेखील सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. विराट, रोहित यांचे चाहते खूप आहेत. बुमराह नवा नायक म्हणून समोर येत आहे. मात्र धोनी या सर्वांच्या खूपच वर आहे.व्हिडीओसाठी पाहा

www.lokmat.com

(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत ) 

टॅग्स :भारतीय जवानवर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघ