Join us

ब्राव्होचं 'गॅटमॅट'?... 'या' बॉलिवूड नायिकेसोबत करतोय डेटिंग 

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 14:28 IST

Open in App

मुंबई -  बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात. ताजंच उदाहरण द्यायचं तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अफेअर नंतर लग्न केलं. याच पंक्तीत आणखी एका जोडप्याचा समावेश झाला आहे. स्पॉटबाय वेबसाईटच्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि अभिनेत्री नताशा सूरी सद्या एकमेंकाना डेटिंग करत आहे. आणि या जोडप्याची चर्चा क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये रंगली आहे. 

मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यादरम्यान नताशा ब्राव्होला चिअरअप करताना दिसली होती. नताशा सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. ब्राव्होसोबतचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तिने ब्राव्हो जा आणि चांगली खेळी कर असे लिहले होते. या सामन्यानंतर ब्राव्हो आणि नताशा यांना एका कॉफी शॉपमध्ये पाहण्यात आलं होतं. दहा वर्षापूर्वी दोघे पहिल्यांदा भेटले होते. तेव्हापासून हे दोघे एकमेंकाच्या संपर्कात आहेत. कॉफी शॉपमधील दोघांचा फोटोही नताशाने शेअर केला होता. 

33 वर्षीय नताशा माजी मिस इंडिया विजेती आहे. नताशाने 'बा बा ब्‍लैक शीप' या चित्रपटात अनुपम खेरसोबत काम केलं आहे. चित्रपटाप्रमाणे वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स