इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोस बटलरच्या अनुपस्थितीत स्मिथनं सलामीला येण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आवडला. त्याला सॅमसनने जबरदस्त साथ दिली. पण, सॅमसन बाद झाल्यानंतर टप्प्याटप्य्यानं RRच्या विकेट्स पडल्या. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. ( CSK vs RR Live Score & Updates )
महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं
'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण
RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं सलामीला आला. त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. सॅमसननं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीनं रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरनं झेल टिपला. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्या. ( CSK vs RR Live Score & Updates )
पाहा त्याचे षटकार...
पाहा व्हिडीओ...
जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल
केदार जाधव ( Kedar Jadhav) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी 37 धावांची भागीदारी केली, परंतु टॉम कुरनच्या गोलंदाजीवर जाधव यष्टिंमागे संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जाधवने 22 धावा केल्या. संजूनं सुपर कॅच घेत CSKला मोठा धक्का दिला.
पाहा सुपर कॅच
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?
रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ
यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच
SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video
युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली