Join us  

CSK vs RR Latest News : २००व्या IPL सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा आणखी एक पराक्रम

प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 8:35 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर असले तरी अन्य संघांनाही समान संधी आहे. त्यामुळे या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला माघारी जावं लागले. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेल्या जोस बटलरनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. फॅफ १० धावांवर माघारी परतला. कार्तिक त्यागीचे पहिल्याच षटकात तीन चौकाराने स्वागत झाले, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं शेन वॉटसनला ( ८) माघारी पाठवून CSKला मोठा धक्का दिला. जोस बटलरचा सुरेख झेल; जोफ्रा आर्चरनं दिला CSKला मोठा धक्का, Video

त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूनं ( Ambati Rayudu) स्वतःचं नाव एका वेगळ्या पंक्तीत नोंदवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला. ९व्या षटकात श्रेयस गोपाळच्या पहिल्याच चेंडूवर कुरनचा झेल यष्टिरक्षक संजू सॅमसननं झेल सोडला. जीवदान मिळाल्यानंतर कूरन मोठी खेळी करेल असे वाटत होते, परंतु पुढच्याच चेंडूवर फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही. कुरन ( २२) जोस बटलरकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. राहुल टेवाटियानं CSKला धक्का देताना रायुडूला ( १३) बाद करून RRला मोठे यश मिळवून दिले. चेन्नईचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ५६ धावांत तंबूत परतले होते. २०० वा आयपीएल सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून ४००० धावा पूर्ण केल्या.  अंबाती रायुडूचा पराक्रम; विराट, रोहित, धोनी यांच्या पंक्तित पटकावले स्थान

महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील कामगिरीसामने - १९९धावा - ४५६८*सर्वोत्तम धाव - ८४*सरासरी - ४१.५२स्ट्राईक रेट - १३७.६७अर्धशतकं - २३चौकार - ३०६षटकार - २१५ 

 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स