CSK vs RR Latest News : Jos Buttler is just as good without the gloves, take brillient catch of Faf du Plessis, Video | CSK vs RR Latest News : जोस बटलरचा सुरेख झेल; जोफ्रा आर्चरनं दिला CSKला मोठा धक्का, Video

CSK vs RR Latest News : जोस बटलरचा सुरेख झेल; जोफ्रा आर्चरनं दिला CSKला मोठा धक्का, Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर असले तरी अन्य संघांनाही समान संधी आहे. त्यामुळे या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Chennai Super Kings XI: सॅम कुरन, फॅफ ड्यू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, जोश हेझलवूड, पीयूष चावला, दीपक चहर, शार्दूल ठाकूर

Rajasthan Royals XI: रॉबीन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी

प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला माघारी जावं लागले. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेल्या जोस बटलरनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. फॅफ १० धावांवर माघारी परतला.

पाहा व्हिडीओ...


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs RR Latest News : Jos Buttler is just as good without the gloves, take brillient catch of Faf du Plessis, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.