Join us  

CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछुट शिकार करण्याच्या निर्धारानं पंजाबनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 9:17 PM

Open in App

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछुट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी सुरुवातही तशीच करून दिली. पंजाबनं CSKसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण, याच सामन्यात CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं एक विक्रमी शतक साजरे केले. 

इशान किशनच्या 'भन्नाट' कॅचनं डेव्हिड वॉर्नरचा झंझावात रोखला, Video

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. पीयूष चावलानं ही भागीदारी तोडली. त्यानं मयांकला २६ धावांवर माघारी पाठवले. करुण नायरच्या जागी संघात मनदीप सिंगला स्थान देण्यात आले होते आणि त्यानं दोन खणखणीत षटकार मारून त्याची निवड सार्थ असल्याचे दाखवले. मात्र, त्याला रवींद्र जडेजाच्या फिरकीचा अंदाज बांधता आला नाही. अंबाती रायुडूच्या हाती झेल देत मनदीप २७ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन आणि लोकेश यांनी दमदार फटकेबाजी करून KXIPचा डाव रुळावर आणला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. 

शार्दुल ठाकूरने ( Shardul Thakur) एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. सुरुवातीला त्यानं पूरनला बाद केले. पूरननं टोलावलेला चेंडू उत्तुंग उडाला, परंतु रवींद्र जडेजानं तो सुरेखरित्या झेलला. पुढच्याच चेंडूवर धोनीनं चपळतेनं लोकेशचा झेल टिपला आणि एका विक्रमाला गवसणी घातली. पूरनने १७ चेंडूंत ३ षटकारांसह ३३ धावा, तर लोकेशनं ५२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६३ धावा केल्या.  आयपीएलमधील MS Dhoniने यष्टिरक्षक म्हणून १००वा झेल घेतला. दिनेश कार्तिकनंतर हा पल्ला गाठणारा तो दुसरा यष्टिरक्षक आहे. सुरेश रैनानेही खेळाडू म्हणून १०० झेल टिपले आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबला ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाबलोकेश राहुलमयांक अग्रवाल