Join us  

IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध

गेल पंजाब आणि ब्राव्हो चेन्नई संघांकडून खेळतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 1:55 PM

Open in App

मोहाली -  गेलच्या तुफानी फंलदाजीच्या बळावर पंजाबने काल चेन्नईचा चार धावांनी पराभव केला. मोहाली येथे रंगलेल्या सामन्यात गेलने 33 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली.  गेल आणि राहुलच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजाबच्या पहिल्या दहा षटकांत 115 धावा फलकावर लागल्या होत्या. गेलच्या या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजबाने 20 षटकांत  197 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, धोनीच्या चेन्नईला 5 बाद 193 धावाच करता आल्या. धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.   

या सामन्यात प्रेक्षकांना खेळातल्या मैत्रीचा एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. ख्रिस गेल आणि चेन्नईचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्यातला हा क्षण होता. ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत जेव्हा सलामीला आला तेव्हा त्याच्या बुटाची लेस सुटली. यानंतर गेलने आपला सहकारी खेळाडू आणि मित्र ब्राव्होला बोलावलं आणि लेस बांधायला सांगितली. ब्राव्होही तातडीने गेलच्या जवळ गेला आणि लेस बांधली.  

गेल पंजाब आणि ब्राव्हो चेन्नई संघांकडून खेळतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते, याचं उदाहरण या दोघांमुळे पाहायला मिळालं आहे. या दोघांच्या मैत्रीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

 

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब