Join us  

CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video

DC vs CSK Latest News & Live Score चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 9:27 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. संयमी सुरुवातीनंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. या सामन्यात MS Dhoniनं सुपर स्टम्पिंगसह अफलातून कॅच घेत सर्वाना थक्क केलं. DC vs CSK Latest News & Live Score 

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

CSKने संघात एक बदल केला असून लुंगी एनगिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी दिली आहे. DCच्या संघातही दोन बदल पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त आर अश्विनच्या जागी अमित मिश्राला,तर मोहित शर्माच्या जागी आवेश खान याला संधी दिली आहे. DC ओपनर शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यांनी पॉवर प्लेमध्ये संयमी खेळ केली. 

DC vs CSK Latest News & Live Score 

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पृथ्वीनं IPL2020मधील पहिले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. पण 11 व्या षटकात ही जोडी पीयूष चावलानं तोडली. त्यानं धवनला ( 35) माघारी पाठवलं. पाठोपाठ चावलानं 64 धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वीलाही बाद केलं. यानंतर CSKच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. धोनीनं त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCच्या धावसंख्येवर लगाम लावला. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीनं यष्टिमागे कमाल केली. त्यानं पृथ्वी शॉला यष्टिचीत करून माघारी जाण्यास भाग पाडले. 

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी केली. सॅम कुरननं 19व्या षटकात सुरेख गोलंदाजी करताना DCच्या धावगतीला वेसण घातलं. त्यानं अय्यरला ( 26) बाद केले. यष्टिंमागे धोनीनं अफलातून झेल घेतला. दिल्लीनं 20 षटकांत 3 बाद 175 धावा केल्या. अखेरच्या षटकात 14 धावा चोपल्या गेल्या. रिषभनं 25 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं सुपर स्टम्पिंग नंतर अफलातून झेल घेतला. पाहा व्हिडीओ... 

 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स