आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यासाठी अजून काही महिने बाकी असले तरी, चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याबद्दल चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा धोनी आगामी हंगामात खेळणार की नाही, असा प्रश्न प्रत्येक सीएसके चाहत्याच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान धोनी म्हणाला की, आगामी आयपीएलमध्ये खेळायचे की नाही, या निर्णयावर विचार करण्यासाठी अजून काही वेळ आहे. डिसेंबरच्या आसपास तो यावर निर्णय घेईल. तो म्हणाला की, "माझे गुडघे पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मी खेळेन की नाही, हे मला अजून माहित नाही. माझ्याकडे डिसेंबरपर्यंत विचार करण्याचा वेळ आहे आणि मी त्यानंतरच ठरवेल." तितक्यात धोनीचा एक चाहता तुला खेळावेच लागेल, असा ओरडला. यावर धोनीने गंमतीशीर उत्तर दिले. "गुडघ्याच्या दुखण्याची काळजी कोण घेईल!", असे धोनी म्हणाला.
आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर धोनीने मुंबईत गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर, धोनीने २०२४ आणि २०२५ च्या हंगामात खेळले, पण बहुतेक सामन्यांमध्ये त्याने खालच्या क्रमावर फलंदाजी केली. आयपीएलच्या मागच्या हंगामात ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर धोनीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. त्यामुळे आयपीएल २०२६ मध्ये चेन्नईचा संघ कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
धोनीची आयपीएल कारकीर्दधोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे सुपर जायंट्स या दोन संघाकडून खेळला आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण २७८ सामने खेळले आहेत, ज्यात ३८.३ च्या सरासरीने आणि १३७.४६ च्या स्ट्राइक रेटने ५ हजार ४३९ धावा केल्या आहेत. धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण २६४ षटकार आणि ३७५ चौकार मारले आहेत.