इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा धमाका करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची तयारी सुरु केल्यावर नेट्स प्रॅक्टिसमधील त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. त्यात आता धोनीच्या नव्या अवताराची भर पडलीये. महेंद्रसिंह धोनीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीचा नव्या अंदाजानं लुटली मैफिल; व्हिडिओ व्हायरल
महेंद्रसिंह धोनीचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो एका जाहिरातीचा आहे. 'अॅनिमल' दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्याही झलक या व्हिडिओत पाहायला मिळते. धोनीनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात लांब हेअर स्टाइलसह केली होती. रणबीर कपूरच्या चित्रपटातील लूकसह खास सीन रिक्रिेट करताना अनेकांना धोनीचा जुना अंदाज आठवू शकतो. या व्हि़डिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून अभिनेता रणबीर कपूर भारी की, थाला अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळते.
धोनीच्या नावे आहे IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड
महेंद्रसिंह धोनी २००८ च्या पहिल्या हंगामापासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. आतापर्यंत त्याने २६४ सामने खेळले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा हा विक्रमच आहे. त्याच्या पाठोपाठ या ादीत दिेनश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून २५७ सामने खेळले आहेत.
यंदाच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात खेळणार धोनी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मेगा लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवले होते. जुना नियम नव्याने लागू झाल्यावर धोनीला अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात फक्त ४ कोटी रुपये मिळाले. फ्रँचायझीच्या हितासाठी त्याने जवळपास ८ कोटींचा फटका सहन केलाय. आता मैदानात तो किती योगदान देणार ते पाहण्याजोगे असेल.