सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो...

जडेजाला नेतृत्व करण्याची संधी दिली तरच तो चांगला कर्णधार होऊ शकेल. तो जेव्हा चुका करेल तेव्हाच शिकेल’, असे पार्थिव पटेलने म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:15 AM2022-04-02T05:15:18+5:302022-04-02T05:15:55+5:30

whatsapp join usJoin us
CSK captain Jadeja; Only Dhoni decides ... | सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो...

सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आयपीएल १५ मध्ये गुरुवारी झालेला चेन्नई आणि लखनऊ यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा ठरला. चेन्नईचा दुसरा पराभव झाला. दरम्यान, चेन्नईचे नेतृत्व आणि महेंद्रसिंह धोनीची भूमिका यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. माजी खेळाडू अजय जडेजा आणि पार्थिव पटेल यांनी धोनीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

‘धोनी मोठा खेळाडू आहे. मी त्याचा चाहता आहे. मोसमातील शेवटचा सामना असता तर धोनीने संघाला मार्गदर्शन करणे योग्य होते. मात्र दुसराच सामना असताना धोनीने मार्गदर्शन करणे मला योग्य वाटले नाही’, अशा शब्दांत अजय जडेजाने नाराजी व्यक्त केली.
पार्थिव पटेलनेही या मताशी सहमती दर्शवली. धोनीने कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर जडेजाला स्वातंत्र्य द्यायला हवे, असे मत पार्थिवने मांडले. ‘तुम्हाला जर नवे नेतृत्व निर्माण करायचे असेल तर त्याला स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. जडेजाला नेतृत्व करण्याची संधी दिली तरच तो चांगला कर्णधार होऊ शकेल. तो जेव्हा चुका करेल तेव्हाच शिकेल’, असे पार्थिव पटेलने म्हटले.

रवींद्र जडेजाच्या पत्नीची उपस्थिती
चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा गुरुवारी सामन्याला उपस्थित होती. व्हीआयपी गॅलरीतून रिवाबा सुपर किंग्सला चिअर करताना दिसली. सोबत तिची दोन्ही मुले होती.

Read in English

Web Title: CSK captain Jadeja; Only Dhoni decides ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.