Join us  

इंटरनेटवर MS Dhoni सर्च करताय मग वेळीच सावध व्हा; ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात 'खतरनाक' सेलिब्रेटी!

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंग, संजू सॅमसन, राहुल टेवाटिया हे सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: October 07, 2020 3:42 PM

Open in App

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंग, संजू सॅमसन, राहुल टेवाटिया हे सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहेत. Indian Premier League ( IPL 2020) सुरू असल्यानं या खेळाडूंचा इंटरनेटवर अधिक सर्च होताना दिसत आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते, पण तुम्हीही या खेळाडूंचा इंटरनेटवर सर्च करत असाल, तर ही बातमी वाचून सावध व्हा... 

McAfee’sने केलेल्या सर्व्हेनुसार भारतात MS Dhoniच्या नावाचा सर्च करणे तुम्हाला संकटात टाकू शकते. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo)सह महेंद्रसिंग धोनी यांचं  नाव एका विचित्र लिस्टमध्ये दाखल झाले आहे. McAfee’sच्या सर्व्हेनुसार रोनाल्डो आणि धोनी हे सर्वात खतरनाक ( most dangerous celebrities ) सेलिब्रेटी आहेत. रोनाल्डोनं या नकोशा यादीत धोनीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.  McAfee’sच्या अभ्यासानुसार रोनाल्डोच्या नावाचा इंटरनेटवर सर्च करताना अनेक धोकादायक लिंक्स ओपन होत असल्याचे समोर आले आहे. McAfee’sच्या अभ्यासात 2020मधील सर्वाधिक खतरनाक सेलिब्रेटींमध्ये रोनाल्डो अव्वल स्थानी आहे.  

मागील वर्षी रोनाल्डो या यादीत दहाव्या स्थानी होता, तर महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर होता. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू दुसऱ्या, तापसी पन्नू तिसऱ्या स्थानावर होते. यंदा धोनी हा अव्वल दहामधून बाहेर फेकला गेला आहे.  

टॉप सेलिब्रेटी1 ख्रिस्तियानो रोनाल्डो2 तब्बू 4 अनुष्का शर्मा6 अरमान मलिक8 दिव्यांक त्रिपाठी10 अरिजीत सिंग  

जगातील सर्वात खतरनाक सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री अॅना केड्रीक अव्वल स्थानी आहे. McAfee’sचे एमडी वेंकट कृष्णपूर यांनी सांगितले की,''या सेलिब्रेटींच्या नावाचा सर्च मोठ्या प्रमाणात होत असल्यानं सायबर क्राईम करणारे धोकादायक लिंक जोडतात. त्यामुळे सर्च करणाऱ्या व्यक्तिला आर्थिक गंडाही घातला जाऊ शकतो. वैयक्तित माहितीची चोरली जाऊ शकते.''  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीख्रिस्तियानो रोनाल्डो