Join us  

भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच संकटात; पण असं घडलं तरी काय...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर आता कसोटी मालिका मालिकेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:42 PM

Open in App

मुंबई : सामना सुरु होण्यापूर्वीच भारताचा सामना संकटात पडल्याचे दिसत आहे. भारताचा जिथे सामना होणार होता, तेथील स्टेडियमयची अवस्थी ही सध्याच्या घडीला चांगली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वीच स्टेडियम चांगल्या स्थितीत नसल्यामुळे हा सामना संकटात सापडला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर आता कसोटी मालिका मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा सलामीला येणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

यापूर्वी भारताचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बाजी मारली होती. आता वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर डिसेंबरमध्ये येणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 22 डिसेंबरला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना कटक येथील बाराबाती स्टेडियममध्ये होणार आहे. पण आता या सामन्यावर संकट आल्याचे म्हटले जात आहे. कारण बाराबाती स्टेडियमची अवस्था बिकट असल्याचे म्हटले जात आहे. हे काम येत्या तीन महिन्यांमध्ये होऊ शकत नाही, असा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी बीसीसीआय हलवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यावर्षीच कटक येथे वादळ आले होते. या वादळामध्ये कटकच्या स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा सामना बीसीसीआय दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका