Join us  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील  पाचव्या कसोटीवर संकट? धरमशालामधून येतेय अशी अपडेट 

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत  ३-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना हा ७ मार्चपासून हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 5:56 PM

Open in App

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत  ३-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना हा ७ मार्चपासून हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी  धरमशालातील हवामानाने दोन्ही संघांची चिंता वाढवली आहे. हा सामना सुरू असताना धरमशालामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गारपीटही होण्याची शक्यता आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी धरमशाला येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत गारपीटही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असं घडलं तर पहिल्या दिवसाचा खेळ थांबवावा लागू शकतो. यादरम्यान धरमशाला येथील कमाल तापमान हे ७ डिग्री आणि किमान तापमान हे ४ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना अशा वातावरणात खेळण्याची सवय आहे. मात्र भारतीय खेळाडू हे बहुतांश सर्वसामान्य तापमानामध्ये खेळत असल्याने त्यांच्यासमोर अडचणी येऊ शकतात. 

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये जानेवारी महिन्यात मोहाली इथे टी-२० सामना खेळला गेला होता. त्यावेळी भारतीय संघामधील खेळाडूंना येथे खेळताना काहीसा त्रास होत असल्याचे दिसून आले होते.  अफगाणिस्तानविरुद्धच्या त्या टी-२० सामन्यापूर्वी सरावसत्रादरम्यान भारताचे बरेचसे खेळाडू थंडीने कुडकुडताना दिसत होते. त्यावेळी कुणी तापमान विचारत होतं. तर कुणी खिशातून हा बाहेर न काढण्याचा सल्ला देत होतं.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटिदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडहवामान