Join us  

धक्कादायक! या खेळाडूंवरही लागले होते सेक्स स्कॅंडलचे आरोप

क्रिकेटर्सच्या सेक्स स्कॅंडलची किंवा त्यांच्यावर झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांचीही चर्चा होऊ लागली आहे. चला जाणून घेऊ याआधी कोणत्या खेळाडूंवर झाले होते असे आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 2:11 PM

Open in App

मुंबई : श्रीलंकेचा क्रिकेटर धनुष्का गुणतिलका याला नॉर्वेच्या महिलेला हॉटेल रूममध्ये आणल्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे. गुणतिलका या सीरिज दरम्यान महिलेला रूममध्ये आणल्यामुळे आचारसंहीतेचं उल्लंघन केल्याबाबत दोषी ठरवलं आहे. इतकेच नाहीतर त्याच्या एक मित्रावर नॉर्वेच्या महिलेने बलात्काराचाही आरोप लावला आहे. त्यामुळे गुणतिलका याला निलंबित करण्यात  आलंय. सध्या या सेक्स  स्कॅंडलची चर्चा रंगली असतानाच याआधीही झालेल्या अशा क्रिकेटर्सच्या सेक्स स्कॅंडलची किंवा त्यांच्यावर झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांचीही चर्चा होऊ लागली आहे. चला जाणून घेऊ याआधी कोणत्या खेळाडूंवर झाले होते असे आरोप...

वसीन अक्रमवर स्ट्रिप क्लबमध्ये जाण्याचा आरोप

वसीम अक्रमच्या मैदानातील खेळासोबतच त्याच्या मैदानाबाहेरील रासलीलाही चांगल्याच गाजल्या. १९९८ मध्ये पाकिस्तान टीम साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असताना एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने आरोप केला होता की, टीमचे दोन खेळाडू वसीम अक्रम आणि सकलेन मुश्ताक यांना मारहाण करण्यात आली होती. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती की, दोन्ही खेळाडू एका स्ट्रिप क्लबमध्ये गेले होते. क्लबमध्ये स्थानिक लोकांनी या दोघांना मारहाण केली होती. 

ड्रग्स आणि अफेअरमुळे वॉर्न चर्चेत

प्रसिद्ध लेग स्पिनर शेन वॉर्न याने क्रिकेटच्या मैदानावर ऐतिहासिक यश मिळवलं. वॉर्न मैदानाबाहेरही आपल्या अफेअर्समुळे चांगलाच चर्चेत होता. तो ड्रग्समुळेही बदनाम झाला होता. वॉर्नवर २००० साली एका ब्रिटीश नर्ससोबत आणि २००३ मध्ये एका स्ट्रिपरसोबत अश्लिल वक्तव्य केल्याचा आरोप लावण्यात आला होता. 

आफ्रिदीच्या रूममध्ये मिळाल्या होत्या मुली

पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या लूक्समुळे महिलांमध्ये चांगलाच लोकप्रिय होता. २००० साली एक सीरिज सुरू असताना त्याच्यावर कराचीतील हॉटेल रूममध्ये मुलीसोबत असल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी आफ्रिदीसोबत हसन रजा आणि अतीक-उज-जमान हेही असल्याचा आरोप होता. आफ्रिदीने स्पष्टीकरण दिले होते की, तो मुलींना ऑटोग्राफ देत होता. पण त्यावेळी पाकिस्तान बोर्डाने तिघांवरही कारवाई करत तिघांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बंदी घातली होती. 

केविन पीटरसनच्या गर्लफ्रेन्डने लावले होते गंभीर आरोप

२००५ साली केविन पीटरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख बनवत होता तेव्हाच त्याची गर्लफ्रेन्ड वेनीसा निमोने त्याच्यावर गंभीर आरोप लावले होते. केविनला सतत माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहे त्यामुळे केविनसोबत ब्रेकअप केल्याचं तिने सांगितलं होतं. 

दिलफेंक आशिक क्रिस गेल

क्रिस गेल हा सुद्धा मैदानात जितका लोकप्रिय आहे तितकाच तो मैदानाबाहेरील त्याच्या प्रकरणांमुळेही लोकप्रिय आहे. कॅमेरासमोर रिपोर्टरसोबत फ्लर्ट करण्यापासून ते खुलेआम ट्विटरवरून डेटसाठी विचारणा करण्याचं काम क्रिस गेलने केलं आहे. २०१२ टी-२० वर्ल्ड कपवेळी श्रीलंकेत त्याच्या हॉटेल रूममध्ये ३ ब्रिटीश मुली आढळून आल्या होत्या. 

टॅग्स :क्रिकेटगुन्हा