चार वर्षांत टीममधून ड्रॉप झालो नाही अन् एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटआधी बाहेर काढलं; युझवेंद्रनं मौन सोडलं

आयपीएलच्या यूएई अॅडिशनमध्येही चहलने दमदार कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केली होती, मात्र निवड समितीने त्याला वगळले आणि निकाल सर्वांच्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर, एवढ्या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आल्याबद्दल आता युझवेंद्र चहलने मौन सोडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:29 AM2021-11-16T11:29:05+5:302021-11-16T11:32:28+5:30

whatsapp join usJoin us
cricketer yuzvendra chahal speaks about his exclusion from t20 world cup team said he is not something like this to happen India vs new zealand | चार वर्षांत टीममधून ड्रॉप झालो नाही अन् एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटआधी बाहेर काढलं; युझवेंद्रनं मौन सोडलं

चार वर्षांत टीममधून ड्रॉप झालो नाही अन् एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटआधी बाहेर काढलं; युझवेंद्रनं मौन सोडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची कामगिरी अतिशय लाजिरवाणी झाली. युएईच्या खेळपट्ट्यांवर ना वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री स्पिन कामी आली, ना रविचंद्रन अश्विनला संघाची नाव किनाऱ्याला लावता आली. याशिवाय, राहुल चहरलातर विश्वचषकात केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. कर्णधार विराट कोहलीला ट्रंप कार्ड म्हणवल्या जाणाऱ्या युझवेंद्र चहलची कमतरता स्पष्टपणे जाणवली. आयपीएलच्या यूएई अॅडिशनमध्येही चहलने दमदार कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केली होती, मात्र निवड समितीने त्याला वगळले आणि निकाल सर्वांच्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर, एवढ्या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आल्याबद्दल आता युझवेंद्र चहलने मौन सोडले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्त संस्थेशी बोलताना चहल म्हणाला, "मी गेल्या चार वर्षांत ड्रॉप झालो नाही आणि एकदमच एवढ्या मोठ्या इव्हेंटसाठी मला संघातून वगळण्यात आले. मला खूप वाईट वाटले. मी दोन-तीन दिवस प्रचंड निराश होतो. पण, यानंतर मला महीत होते, की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ आला आहे. मी माझ्या कोचकडे गेलो आणि त्यांच्याशी बराचवेळ चर्चा केली. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी माझी हिंमत वाढवली. माझ्या चाहत्यांनीही सातत्याने मोटिवेशनल पोस्ट शेअर केल्या. यामुळे मला बळ मिळाले. 

यानंर मी माझी स्ट्रेंथ पुन्हा मिळवण्याचा आणि या कन्फ्यूजनमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. मी फार अधिक काळ निराश हारू शकत नव्हतो. कारण याचा परिणाम माझ्या आयपीएल फॉर्मवरही झाला असता.'

चहलने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 सामन्यात 14 विकेट्स घेत प्लेऑफमध्ये पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी चहलचे संघात पुनरागमन झाले आहे. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर, आता रोहित शर्मा या मालिकेपासून T20 कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. तसेच, राहुल द्रविडही या मालिकेसह नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात करेल.

Web Title: cricketer yuzvendra chahal speaks about his exclusion from t20 world cup team said he is not something like this to happen India vs new zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.