...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)

कोट्यवधींच्या कारमधून फिरणारा चहल २०० किलोच्या बुलेटवर बसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:53 IST2025-07-19T15:51:42+5:302025-07-19T15:53:21+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer Yuzvendra Chahal Revs Up Royal Enfield Continental GT 650- Watch His Reaction Goes Viral Watch Video | ...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)

...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yuzvendra Chahal Rides Royal Enfield Continental GT 650 : युजवेंद्र चहल हा तगडी कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटरपैकी एक आहे. क्रिकेटच्या मैदानात आपल्या फिरकीची जादू दाखवून देत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना नाचवणाऱ्या चहल हा आयपीएलमधील सर्वात महागडा फिरकीपटू ठरला आहे. पंजाब किंग्जच्या संघाने या गोलंदाजासाठी १८ कोटी एवढी तगडी रक्कम मोजली होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोट्यवधींच्या कारमधून फिरणारा चहल २०० किलोच्या बुलेटवर बसला अन्...

मोठी कमाई करणारा हा क्रिकेटर महागड्या गोष्टींचा शौकीन आहे. अलिशान घरासह त्याच्या गॅरेजमध्ये कोट्यवधींच्या कारही लागल्या आहेत. कोट्यवधींच्या कारमधून फिरणाऱ्या युजवेंद्र चहलचा एक खास व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तो बुलेटचा ठोका ऐकून थक्क झाल्याचे दिसून येते. २०० किलोच्या बुलेटसोबतची त्याची खास झलक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

लंडनमध्ये चोरीला गेलं चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं ब्रेसलेट; किंमत ऐकून चोरालाही बसेल धक्का!

बुलेटचा ठोका ऐकल्यावर चहलची रिअ‍ॅक्शन होती बघण्याजोगी

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याचा रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी 650 Mr Clean वर बसलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. seewithdarshil नावाच्या युट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये चहल हा भावाने दाखवलेल्या रॉयल एनफील्डची रेस वाढवून बुलेटचं फायरिंग तपासून पाहाताना दिसते. बुलेटचा ठोका ऐकल्यावर चहलची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी आहे. त्याची हावभाव पाहता कोट्यवधीच्या कारमधून फिरणाऱ्या या क्रिकेटरला ही बाईक जाम आवडल्याचे दिसून येते. 

रॉयल एनफील्डमधील सर्वोत्तम मॉडेल; या बुलेटची किंमत किती माहितीये?

चहल जी बाईक पाहून खूश झाला ती Royal Enfield Continental GT 650 मधील सर्वात टॉप मॉडलची बुलेट आहे. जवळपास २१४ किलो वजन असणाऱ्या या बुलेटची एक्स शो रूम प्राइज ३ लाख २५ हजार ८९७ ते ३ लाख ५२ हजार ४५९ रुपये या रेंजमध्ये आहे. ऑन रोड प्राइज ४ लाखांपेक्षा अधिक जाते. 

युजवेंद्र चहलचे कार कलेक्शन

  • लॅम्बोर्गिनी सेंटेनारियो (Lamborghini Centenario)  किंमत १७ कोटी
  • रोल्स-रॉयस (Rolls Royce Wraith)  किंमत ६ कोटी
  • पोर्श केयेन एस (Porsche Cayenne S) किंमत  २ कोटी
  • मर्सिडीज-बेंझ सी क्लास (Mercedes-Benz C-Class) किंमत ७० लाख

Web Title: Cricketer Yuzvendra Chahal Revs Up Royal Enfield Continental GT 650- Watch His Reaction Goes Viral Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.