Join us

सर्फराज खानने बहिणीच्या मैत्रीणीला पटवलं; वाचा रोमाना जहूरसोबतची त्याची Love Story!  

मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खानने ( Sarfaraz Khan)  काश्मीरमधील रोमाना जहूरशी ( Romana) लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 15:53 IST

Open in App

मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खानने ( Sarfaraz Khan)  काश्मीरमधील रोमाना जहूरशी ( Romana) लग्न केले आहे. काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पेशपोरा गावात त्यांचा विवाह झाला. दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्फराज खानची प्रेमकहाणी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सर्फराज खानची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते जाणून घेऊया. 

सर्फराज खानने काश्मीरमधील रोमाना जहूरशी लग्न केले आहे . व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या वराच्या रुपात सर्फराज खान काश्मीरला पोहोचला होता आणि त्याची वधू लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली होती. सर्फराजची पत्नी रोमना जहूरने दिल्लीतून एमएससीचे शिक्षण घेतले होते. सर्फराजची बहीणही दिल्लीत रोमना ज्या कॉलेजमध्ये शिकली होती त्याच कॉलेजमध्ये शिकली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि बहिणीमुळेच सर्फराज खान आणि रोमना यांची पहिली भेट झाली होती.

पहिल्या नजरेत रोमनाच्या प्रेमात सर्फराज खान क्लीन बोल्ड झाला होता आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा सर्फराज-रोमाना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर लग्नाचे प्रकरण पुढे गेले. सर्फराजचे कुटुंबीय लग्नाचा प्रस्ताव घेऊन रोमनाच्या घरी पोहोचले होते. अशा परिस्थितीत दोघांनीही संपूर्ण कुटुंबाच्या संमतीने लग्न केले.

टॅग्स :मुंबईजम्मू-काश्मीरऑफ द फिल्ड
Open in App