Rinku Singh: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंहविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Rinku Singh Controversy: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी रिंकू सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय देवाला देण्यासाठी शेअर केलेली एक एआय रील रिंकूसाठी डोकेदुखी ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:34 IST2026-01-19T14:34:00+5:302026-01-19T14:34:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Cricketer Rinku Singh in Legal Trouble: FIR Filed Over Controversial AI-Generated Video of Deities | Rinku Singh: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंहविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Rinku Singh: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंहविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी रिंकू सिंहवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एआयद्वारे निर्मित एका व्हिडिओमुळे रिंकूविरुद्ध उत्तर प्रदेशातील अलिगड येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.

रिंकू  सिंहने नुकतीच सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या क्रिकेटमधील यशाचे श्रेय देवाला दिले. मात्र, या व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि श्री गणेश यांना एका कारमध्ये चष्मा घालून बसलेले दाखवण्यात आले. याच व्हिडिओमध्ये रिंकू सिंहला मैदानात षटकार मारतानाही दाखवण्यात आले. देवतांचे अशा प्रकारे चित्रण केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

रिंकूच्या या रीलवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला असला तरी, करणी सेनेने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. देवतांचे हे रूप अपमानजनक असल्याचे सांगत करणी सेनेने अलिगडमधील सासनी गेट पोलीस स्टेशनमध्ये रिंकू सिंहविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. रिंकूने याप्रकरणी जाहीर माफी मागावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणी सेनेने केली आहे.

बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रिंकूसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. २१ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी सज्ज होत असतानाच आता कायदेशीर कचाट्यात अडकल्याने त्याच्या कामगिरीवर याचा परिणाम होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : रिंकू सिंह के खिलाफ धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने की शिकायत दर्ज।

Web Summary : क्रिकेटर रिंकू सिंह की मुश्किलें बढ़ीं, धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने का आरोप लगा है। एआई-जनित वीडियो में देवताओं को कार में दिखाने पर शिकायत दर्ज हुई। करणी सेना ने माफी और कानूनी कार्रवाई की मांग की। न्यूजीलैंड श्रृंखला से पहले कानूनी अड़चन।

Web Title : Rinku Singh faces police complaint over religious sentiments in AI video.

Web Summary : Cricketer Rinku Singh is in trouble after a complaint was filed against him for allegedly hurting religious sentiments. An AI-generated video showing deities in a car led to the complaint. Karni Sena demands an apology and legal action. This legal hurdle comes before the New Zealand series.