वडिलांनंतर अवघ्या १० दिवसात मुलाचंही निधन; क्रिकेटपटू मोहपात्रा कोरोनाविरुद्ध हरले

९ मे रोजी प्रशांतचे वडील आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचेदेखील कोरोनाने निधन झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 06:04 IST2021-05-20T06:02:47+5:302021-05-20T06:04:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Cricketer Prashant Mohapatra Died due to Corona Virus | वडिलांनंतर अवघ्या १० दिवसात मुलाचंही निधन; क्रिकेटपटू मोहपात्रा कोरोनाविरुद्ध हरले

वडिलांनंतर अवघ्या १० दिवसात मुलाचंही निधन; क्रिकेटपटू मोहपात्रा कोरोनाविरुद्ध हरले

भुवनेश्वर : ओडिशा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा याचे कोरोनामुळे स्थानिक एम्स रुग्णालयात बुधवारी निधन झाले. ४७ वर्षांच्या प्रशांतवर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आरोग्य अधीक्षकांनी दिली. 

९ मे रोजी प्रशांतचे वडील आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचेदेखील कोरोनाने निधन झाले. प्रशांतचा भाऊदेखील संक्रमित असून त्याच्यावर याच इस्पितळात उपचार सुरू आहेत. १९९० मध्ये रणजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या प्रशांतने ४५ प्रथमश्रेणी सामने खेळले. निवृत्तीनंतर ‘बीसीसीआय’ने त्याची मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली होती.
 

Web Title: Cricketer Prashant Mohapatra Died due to Corona Virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.