'या' खेळाडूनं गुपचुप उरकले लग्न, दिल्ली पोलिसात आहे पत्नी 

विराट कोहलीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटरने गुपगुप लग्न उरकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 07:45 PM2018-03-09T19:45:29+5:302018-03-09T19:45:29+5:30

whatsapp join usJoin us
cricketer parvinder awana married with si sangita | 'या' खेळाडूनं गुपचुप उरकले लग्न, दिल्ली पोलिसात आहे पत्नी 

'या' खेळाडूनं गुपचुप उरकले लग्न, दिल्ली पोलिसात आहे पत्नी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नई दिल्ली - विराट कोहलीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटरने गुपगुप लग्न उरकले आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज परविंदर अवाना मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकला. त्याचे लग्न दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक संगीता कसाना हिच्याशी झालं आहे. 

परविंदर अवाना आणि संगीता कसाना यांचे लग्न भोपूरा गावामध्ये पारंपारिक पद्धतीनं पार पडले. यावेळी दोन्ही कुटुंबिय आणि जवळील व्यक्ती हजर होते. उद्या 10 मार्च रोजी ग्रेटर नोयडामध्ये रिसेप्शन होणार आहे. यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटर हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

परविंदर नोएडाजवळील हरौला गावातील रहिवाशी आहे. परविंदर दिल्लीच्या आयकर विभागात इंस्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. 
परविंदर आवाना भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. रणजीमध्ये त्यानं दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर आयपीएलमध्ये पंजाबसंघाकडून खेळला आहे. 

Web Title: cricketer parvinder awana married with si sangita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.