Join us
Daily Top 2Weekly Top 5

' या ' क्रिकेटपटूची गोलंदाजी पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ...

यापूर्वी इंग्लंडचे ग्रॅहम गूच आणि श्रीलंकेच्या कामिंडू मेडिंस यांनी दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:56 IST

Open in App
ठळक मुद्देएका गोलंदाजाने एका सामन्यात जेव्हा दोन्ही हातांनी गोलंदाजी केली, तेव्हा सारेच जण चकित झाले.

चेन्नई : एकाच सामन्यात दोन हातांनी गोलंदाजी करताना तुम्ही फारसे कुणाला पाहिले नसेल. त्यामुळे एका गोलंदाजाने एका सामन्यात जेव्हा दोन्ही हातांनी गोलंदाजी केली, तेव्हा सारेच जण चकित झाले. ही गोष्ट भारतात घडली, असं समजल्यावर तुम्हाला धक्काही बसेल.

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये एका गोलंदाजाने हा पराक्रम केला आहे. या लीगच्या वीबी कांची विरंस आणि डिंडिगुल ड्रॅगन्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही गोष्ट घडली. या सामन्यात कांची संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांच्या संघातील मोकित हरीहरन हा गोलंदाज सर्वांच्याच लक्षात राहीला. कारण या सामन्यात हरीहरनने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली.

दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा हरीहरन काही पहिला गोलंदाज नाही. कारण यापूर्वी इंग्लंडचे ग्रॅहम गूच आणि श्रीलंकेच्या कामिंडू मेडिंस यांनी दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये अक्षय कर्णेवारनेही दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे.

टॅग्स :क्रिकेटक्रीडातामिळनाडू