Join us

Smriti Mandhana: 'अ‍ॅलेक्सा'ला सांगून स्मृती मानधनानं हरलीनला केलं गप्प!, केलं भन्नाट ट्विट 

भारतीय महिला क्रिकेट संघाची दुसरी स्टार खेळाडू हरलीन देओलनं केलेल्या मजेशीर ट्विटवर आता स्मृतीनंही दिलेल्या हटके प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 23:00 IST

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज आणि मराठमोठ्या स्मृती मानधनानं ऑस्ट्रेलियात शतकी खेळी साकारून इतिहास रचला. मानधनानं केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. डे-नाइट क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूवर शतक ठोकणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. यातच भारतीय महिला क्रिकेट संघाची दुसरी स्टार खेळाडू हरलीन देओलनं केलेल्या मजेशीर ट्विटवर आता स्मृतीनंही दिलेल्या हटके प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

स्मार्ट असिस्टंट 'अ‍ॅलेक्सा' आपण ज्या कमांड देतो त्या कमांड ऐकून तसं अ‍ॅलेक्सा यूझरच्या मागण्या पूर्ण करते हे तंत्रज्ञान आपल्याला माहितच आहे. याच 'अ‍ॅलेक्सा'च्या नावाचा मिश्किलपणे वापर करत हरलीन देओल हिनं स्मृती मानधनाचा शतक झळकावल्यानंतरच्या सेलिब्रेशनचा फोटो ट्विट केला होता. यात स्मृतीचे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले दिसतात. 'अ‍ॅलेक्सा प्लीज ''ओ हसीना झुल्फो वाली'' हे गाणं सुरू कर', अशी कमांड कॅप्शनमध्ये ट्विट करत हरलीननं स्मृती मानधनाला टॅग केलं होतं. त्यावर स्मृतीनंही हजरजबाबीपणा दाखवत जशास तसं मजेशीर ट्विट केलं आहे. "अ‍ॅलेक्सा प्लीज हरलीन देओल हिला म्यूट कर'', अशी कमांड देत असल्याचा रिप्लाय दिला आहे. 

स्मृतीनं ऑस्ट्रेलियात रचला इतिहासऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिनं  51 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या स्मृतीने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात आपलं शतक पूर्ण केलं. 

भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृती आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.

मानधनाने 170 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने आपली धडाकेबाज शतकी खेळी पूर्ण केली. भारताकडून गुलाबी चेंडूवर शतक बनवणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे. दरम्यान, 15 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला क्रिकेट संघात हा कसोटी सामना होत आहे

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App