आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

आलियाने एका क्रिकेटपटूला लव्ह सिग्नल दिल्याची चर्चा आहे. तिच्या या सिग्नलवर या क्रिकेटपटूही प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 05:37 PM2019-08-27T17:37:07+5:302019-08-27T17:37:52+5:30

whatsapp join usJoin us
'A' cricketer fell in love with Alia Bhatt's after she given signal of love | आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बॉलीवूडमधील तारे-तारकांच्या अफेअर्सची चर्चा नेहमीच रंगत असते. बॉलीवूड आणि क्रिकेट यांचेही कनेक्शन प्रणयाच्या खेळपट्टीवर पाहिले गेले आहे. आता तर आलिया भटच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांचे सुत जुळल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी साऱ्यांनाच समजले. पण आता आलियाने एका क्रिकेटपटूला लव्ह सिग्नल दिल्याची चर्चा आहे. तिच्या या सिग्नलवर या क्रिकेटपटूही प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. पण हा क्रिकेटपटू नेमका आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल.

एका क्रिकेटपटूने आलियाचा एक ट्विटरवरील व्हिडीओ पाहिला. हा व्हिडीओ या क्रिकेटपटूला चांगलाच आवडला. हा व्हिडीओ पाहून तो आलियाच्या प्रेमातच पडला. त्यानंतर तिचा दुसरा व्हिडीओही त्याने पाहिला. हे दोन्ही व्हिडीओ त्याने शेअर केले.

आलियाचे व्हिडीओ शेअर केल्यावर त्याला काही चाहत्यांनी प्रश्न विचारले. यामधला सर्वात सोपा प्रश्न होता की, तु या मुलीला ओळखतोस का? यावर या क्रिकेटपटूने 'नाही' असे उत्तर दिले आहे. त्यामुळे आलिया नेमकी कोण आहे, हे या क्रिकेटपटूला माहिती नाही, पण तिचा व्हिडीओ पाहून तो तिच्या प्रेमात पडला आहे. आता हा क्रिकेटपटू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर हा क्रिकेटपटू आहे, दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षेल गिब्स.

 

Web Title: 'A' cricketer fell in love with Alia Bhatt's after she given signal of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.