Cricket in Olympics : मोठी बातमी! १२८ वर्षांचा इतिहास बदलला; आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा थरार

Cricket in Olympics : ऑलिम्पिकचा इतिहास बदलला असून पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:18 PM2023-10-13T16:18:13+5:302023-10-13T16:18:42+5:30

whatsapp join usJoin us
Cricket will make its re-entry to the Olympics for the first time in 128 years, IOC has accepted the inclusion of Cricket in the 2028 Los Angeles Olympics  | Cricket in Olympics : मोठी बातमी! १२८ वर्षांचा इतिहास बदलला; आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा थरार

Cricket in Olympics : मोठी बातमी! १२८ वर्षांचा इतिहास बदलला; आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CRICKET CONFIRMED FOR 2028 OLYMPICS । मुंबई : तब्बल १२८ वर्षांचा ऑलिम्पिकचा इतिहास बदलला असून पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) शुक्रवारी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटला मान्यता दिली. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही मोठी घोषणा केली. 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, लॉस एंजेलिस समितीने ऑलिम्पिकचा भाग होऊ शकणाऱ्या पाच खेळांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. या प्रस्तावानंतर आज क्रिकेटला ऑलिम्पिकसाठी मान्यता देण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे शेवटच्या वेळी १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. 

ऐतिहासिक निर्णय 
आज मुंबईत झालेल्या बैठकीत क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकच्या आयोजकांनी सोमवारी १२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केली होती. शेवटच्या वेळी १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिक क्रिकेटचे सामने झाले होते. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाची माहिती देणारे निवेदन ९ ऑक्टोबर रोजी जारी केले. यादरम्यान, दोन वर्षांच्या प्रक्रियेदरम्यान आयसीसीने लॉस एंजेलिस २०२८च्या ऑलिम्पिक समितीसोबत जवळून काम केल्याचे सांगण्यात आले. खरं तर भारत जवळपास ४० वर्षांनंतर IOC बैठकीचे आयोजन करत आहे. IOC ची ८६ वी बैठक १९८३ मध्ये दिल्ली येथे झाली होती. 

Web Title: Cricket will make its re-entry to the Olympics for the first time in 128 years, IOC has accepted the inclusion of Cricket in the 2028 Los Angeles Olympics 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.