Join us  

Big News : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार?

दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे तो दौरा रद्द करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 4:11 PM

Open in App

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकानं तसा विश्वास व्यक्त केला आहे. दोन वर्षांहून अधिक काळ भारतानं आफ्रिका दौरा केलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु परिस्थिती सुधारल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि बीसीसीआय यापैकी एकानेही या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. पण, सध्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडिया जून-जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. त्यानंतर झिम्बाब्वे दौरा, आशिया कप आणि इंग्लंडविरुद्धची मायदेशातील मालिका, असे टीम इंडियाचे वेळापत्रक आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मायदेशात आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका बीसीसीआयला रद्द करावी लागली होती. त्या मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला होता. धरमशाला येथील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे हा दौराच रद्द करण्यात आला.    

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

Video : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँच्या 'उमराव जान' लूकनं नेटिझन्सना केलं घायाळ 

इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News!

सचिन तेंडुलकर इनस्विंग चेंडूवर चाचपडायचा; पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय