आलिम्पिक सहभागासाठी क्रिकेटचा विस्तार व्हायला हवा : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : क्रिकेट जास्तीत जास्त देशात खेळले गेले तरच या खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकेल, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:03 IST2017-11-23T04:03:31+5:302017-11-23T04:03:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Cricket should be expanded for Olympic participation: Virender Sehwag | आलिम्पिक सहभागासाठी क्रिकेटचा विस्तार व्हायला हवा : वीरेंद्र सेहवाग

आलिम्पिक सहभागासाठी क्रिकेटचा विस्तार व्हायला हवा : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : क्रिकेट जास्तीत जास्त देशात खेळले गेले तरच या खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकेल, असे मत भारताचा
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे. सेंट मॉरिट्ज आईस क्रिकेटच्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेत सध्या सदस्यांची संख्या १०५ आहे. मात्र, यातील फक्त १२ देशच पूर्णवेळ सदस्य आहेत. २०२४ पर्यंत
क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये सहभाग करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्न करीत आहे. १९९० च्या आॅलिम्पिकमध्येच फक्त क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
या वेळी सेहवाग म्हणाला, ‘मला वाटते, आयसीसीने जास्तीत जास्त देशांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी १२ देश पुरेसे नाहीत.’ यासाठी हा खेळ जेथे खेळला जात नाही तेथे या खेळाला प्रोत्साहन दिले पाहिजे. याचाच एक भाग म्हणून सेहवाग स्वित्झर्लंडमध्ये माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने, शोएब अख्तर, डॅनियल व्हिटोरी, मोहम्मद कैफ व ग्रॅहॅम स्मिथ यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार आहे.
या स्पर्धेला ‘आयसीसी’ची मान्यता मिळाली असल्याचा दावा स्पर्धेच्या आायोजकांनी केला आहे.
>खेळाडूंना प्रोत्साहित करणे ही आनंदाची गोष्ट
सेहवाग म्हणाला, ‘तेथील खेळाडूंना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित करणे ही खूपच आनंदाची गोष्ट असेल.’ स्वित्झर्लंड अद्याप ‘आयसीसी’चा सदस्य नाही. दोन वेळा हिवाळी आॅलिम्पिकचे यजमानपद भूषविलेल्या सेंट मॉरिट्ज येथे आठ व नऊ फेब्रुुवारीला आईस क्रिकेट खेळले जाणार आहे.

Web Title: Cricket should be expanded for Olympic participation: Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.