Join us  

BCCI केली अंडर-19 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडे संघाचे नेतृत्व

U-19 WC 2022: 14 जानेवारीपासून अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला असून, यावेळीही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 7:40 PM

Open in App

नवी दिल्ली: अंडर-19 विश्वचषक (U-19 WC 2022) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ऑल इंडिया जूनियर सिलेक्शन कमेटीने रविवारी संध्याकाळी 17 सदस्यीय संघ घोषित केला. यावेळी संघाचे नेतृत्व दिल्लीचा खेळाडू यश धुल याच्याकडे सोपवण्यात आले आहे, तर एसके रशीदला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 

अंडर-19 विश्वचषक येत्या 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेची ही 14वी आवृत्ती आहे. या विश्वचषकात 16 संघ सहभागी होऊन विजेतेपदासाठी प्रयत्न करतील. भारतीय संघाने आतापर्यंत चारवेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले असून यावेळीही तो या स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे.

अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ

यश धुल (कर्णधार), एसके रशीद (उपकर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव (डब्ल्यूके), राज अंगद बाओ, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हंगरकर, वासू वत्सो, विकी ओस्तवाल, रवी कुमार, गरव सांगवान.

स्टँडबाय प्लेअर

ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंह राठौर.

भारतीय संघ चारवेळा विजेता

भारतीय संघाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. याशिवाय हा संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेता ठरला होता. यश धुलच्या नेतृत्वाखाली संघ यावेळी कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली तरी यावेळी संघ विश्वचषक जिंकू शकेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :बीसीसीआयऑफ द फिल्ड
Open in App