Join us  

कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली

2000च्या मॅच फिक्सिंग प्रकरणातील दोषी बुकी संजीव चावलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:31 PM

Open in App

2000च्या मॅच फिक्सिंग प्रकरणातील दोषी बुकी संजीव चावलाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहेत. ''कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही आणि लोकं पाहत असलेले हे सर्व सामने फिक्स असतात. यामध्ये अंडरवर्ल्ड माफियांचा संबंध असतो. ज्याप्रमाणे चित्रपट कोणितरी दिग्दर्शीत करतो, तसेच क्रिकेट सामन्यांचेही आहे,''अशी धक्कादायक माहिती संजीव चावला यांनी दिल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्लीत संजीव चावलाचा जन्म झाला असून लंडनमधून तो सगळा कारभार करत होता. विशेष पोलीस आयुक्त (क्राइम) परवीर राजन यांनी यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिला. जामीन मिळाल्याने संजीव चावला सध्या जेलबाहेर आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.  

1993मध्ये चावला कपड्यांच्या बिझनेससाठी लंडनमध्ये गेला आणि लंडन ऑक्सफोर्ड स्ट्रीटवर त्याचं दुकान होतं. 2000मध्य त्याला ब्रिटनचं नागरिकत्व मिळालं. दक्षिण आफ्रिकेच्या 2000च्या भारत दौऱ्यात चावला आणि अनेकांनी मॅच फिक्सिंग केली होती. चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील संभाषणातून पैसे आणि संघामधील माहिती दिलं जात असल्याचं उघड झाले.  दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे याने आपण मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. 2002 मध्ये विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. 

मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!

बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!

टॅग्स :मॅच फिक्सिंगदिल्ली