Join us

'ये है रजनी स्टाईल'; ख्रिस गेलचा हटके अंदाज, व्हिडीओ व्हायरल

आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचा खेळाडू ख्रिस गेल आपल्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 21:15 IST

Open in App

मुंबई : आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचा खेळाडू ख्रिस गेल आपल्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. अशाच एका हटके अंदाजात ख्रिस गेलने करामत केली आहे. यावेळी ख्रिस गेलने युनिव्हर्सल बॉस रजनीकांत यांच्या स्टाईलची कॉपी केल्याचे दिसून येते. 

ख्रिस गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो अभिनेते रजनीकांत यांच्यासारखी चष्मा घालून स्टाईल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, रजनीकांत यांची आयकॉनिक स्टाईल कॉपी करणे सोपे नाही. मात्र, ख्रिस गेलने त्यांची स्टाईल करण्याचा प्रयत्न केला आहे.

ख्रिस गेल सध्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. ख्रिस गेल नेहमी आपल्या टीमसोबत भांगडा करताना दिसतो. ख्रिस गेलने आतापर्यंत 9 सामन्यात 159.47 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाबकडून सर्वाधिक जास्ता धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल टॉप स्थानावर आहे. 

दरम्यान, आयपीएलमध्ये 10 पैकी 5 सामने किंग्स इलेव्हन पंजाबने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानवर आहे. दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाब अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत आहे. गेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला होता. या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती.   

टॅग्स :ख्रिस गेलआयपीएल 2019