Join us  

१२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये! किती संघ, कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळणार, गोल्ड मेडल कसं मिळणार?

Cricket in Olympics after 128 years - राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर क्रिकेट आता ऑलिम्पिकमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामने खेळवले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 3:53 PM

Open in App

Cricket in Olympics after 128 years - राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर क्रिकेट आता ऑलिम्पिकमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामने खेळवले जातील. मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीनंतर सोमवारी क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाला मंजुरी देण्यात आली. याआधी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट फक्त एकदाच खेळले गेले होते. त्यावेळी त्यात फक्त 2 संघ सहभागी झाले होते. यावेळी ६ संघांना संधी मिळू शकते, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. ICC चे १००पेक्षा जास्त सदस्य आहेत. ऑलिम्पिकमधील क्रिकेट सामने ट्वेंटी-२० फॉरमॅटवर आधारित असतील. भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली आहेत. आता संघाला ऑलिम्पिकमध्येही पदक निश्चित करायचे आहे.

१९००मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये दोनच संघ सहभागी झाले होते आणि २ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ब्रिटनने फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच क्रिकेट खेळला गेला. पुरुष गटात ५० षटकांचे सामने झाले. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. न्यूझीलंडने श्रीलंकेचा ५१ धावांनी पराभव करत कांस्यपदक जिंकले. १६ संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली होती. भारताला तीनपैकी एकच सामना जिंकता आला. आता २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही क्रिकेटचे सामने होणार आहेत.

२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला गटाचे सामने खेळले गेले. येथे सामने T20 च्या आधारावर आयोजित करण्यात आले होते. भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले. सुवर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच चीनमध्ये पार पडली. भारतीय महिला आणि पुरुष संघांनी सुवर्णपदक जिंकले. २०१०मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले. यानंतर २०१४ मध्येही क्रिकेटचा समावेश या खेळांमध्ये करण्यात आला. पण २०१० आणि २०१४ च्या सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ पाठवला नाही. बांगलादेशने पुरुष गटात २०१० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानला रौप्य आणि पाकिस्तानला कांस्यपदक मिळाले. महिला गटात पाकिस्तान संघ सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरला. बांगलादेशला रौप्य तर जपानला कांस्यपदक मिळाले.

२०१४ मध्ये श्रीलंकेला पुरुष गटात सुवर्णपदक मिळाले होते. अफगाणिस्तानला रौप्य आणि बांगलादेशला कांस्यपदक मिळाले. पाकिस्तानने महिला गटात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. बांगलादेशला रौप्य आणि श्रीलंकेला कांस्यपदक मिळाले.   

टॅग्स :टोकियो ऑलिम्पिक 2021भारतीय क्रिकेट संघ