Join us  

India vs Pakistan: भारतीय संघाविरुद्ध पराभूत झालात तर मायदेशी येऊ देणार नाही, पाक कर्णधाराला थेट धमकी

T20 World Cup 2021, India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की चाहत्यांना आपल्या भावना आवरणं कठीण होऊन जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:29 PM

Open in App

T20 World Cup 2021, India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की चाहत्यांना आपल्या भावना आवरणं कठीण होऊन जातं. याचं ताजं उदाहरण आता समोर आलं आहे. एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं आपल्या देशाच्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराला थेट धमकीच दिली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या ट्विटर हँडलवर एका चाहत्यानं धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत २४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केला नाही, तर तुला घरी येऊ देणार नाही, अशी थेट धमकीच या माथेफिरू चाहत्यानं आझमला दिली आहे. 

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायवोल्टेज लढत होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील भारताची पहिलीच लढत पाकिस्तान विरुद्ध होत आहे. त्यामुळे या सामन्याची प्रचंड उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की सामन्याला स्पर्धेच्या अंतिम फेरीचंच स्वरुप प्राप्त होत असतं. सामन्याच्या बऱ्याच दिवसांआधीपासूनच जोरदार चर्चा होते आणि चाहते आपल्या भावना व्यक्त करत असतात. बाबर आझम यानं त्याच्या ट्विटर हँडलवरुन ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी चाहत्यांनी पाठिंबा द्यावा यासाठीच एक ट्विट केलं. तर त्यावर अनेक चाहत्यांनी थेट धमकीवजा इशारा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  Rahil Bhat नावाच्या एका युझरनं बाबर आझमला घरी न परतण्याची थेट धमकीच दिली आहे. दोन्ही संघांमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आजवर पाच सामने झाले आहेत आणि सर्व सामन्यांत भारतानं पाकिस्तानला मात दिली आहे. 

दुसरीकडे बाबर आझमनं भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे तिथल्या परिस्थितीची आणि वातावरणाची आम्हाला चांगली सवय आहे. खेळपट्टी कशी असेल याची कल्पना आम्हाला आहे. जो संघ मैदानात त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करेल तोच जिंकेल आणि मला वाटतं आम्ही जिंकू", असं बाबर आझम म्हणाला. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App