Cricket Coach Assaulted With Bat Over Team Selection Suffers : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याच्या कारणावरुन स्थानिक क्रिकेटपटूंनी मुख्य प्रशिक्षकाला मारहाण केल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पुडुचेरी (CAP) च्या अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक एस. वेंकटरमन यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रशिक्षकांनी केलेल्या आरोपानुसार, तीन स्थानिक खेळाडूंनी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) साठी संघात निवड न झाल्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात प्रशिक्षक वेंकटरमन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला २० टाके घातले असून सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती प्रकृती स्थिर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्य कोचवरील हल्ल्यावर BCCI सचिवांची प्रतिक्रिया, म्हणाले...
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, CAP मध्ये बाहेरील खेळाडूंना बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून स्थानिक संघातून खेळवण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या वृत्तात करण्यात आलेल्या दाव्यानुसार २०२१ पासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत फक्त ५ खेळाडू पुडुचेरी चे आहेत. यासंदर्भात BCCI ने कठोर भूमिका घेत चौकशीची हमी दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. "हे आरोप अतिशय गंभीर आहेत. बीसीसीआय प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे त्यांनी म्हटले आहे.
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
कोण आहेत ते ३ खेळाडूं ज्यांच्यावर प्रशिक्षकावर हल्ला केल्याचा दाखल झाला गुन्हा
पुडुचेरी संघाच्या मुख्य प्रशिक्षकावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रकणात अनुभवी स्थानिक क्रिकेटर कार्तिकेयन जयसुंदरम, अरविंदराज आणि एस. संतोष कुमारन यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
प्रशिक्षकानी आपल्या तक्रारीमध्ये काय म्हटलंय?
प्रशिक्षक वेंकटरमन यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय की, स्थानिक खेळाडूंच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या भारतीदासन पुडुचेरी क्रिकटर्स संघटनेचे सचिव जी. चंद्रन यांनी या खेळाडूंना हल्ला करण्यास प्रवृत्त केले. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मी CAP च्या इंडोर नेट्समध्ये होतो. त्याच वेळी कार्तिकेयन, अरविंदराज आणि संतोष कुमारन तिथे आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याचा राग काढताना त्यांनी शिवीगाळ करत हल्ला केला. अरविंदराजने मला पकडलं आणि कार्तिकेयनने बॅटने हल्ला केला. ते मला मारून टाकण्याच्या उद्देशाने आले होते. चंद्रन म्हणाला आहे की, हा कोच जिवंत असेपर्यंत तुला संधी मिळणार नाही, असे म्हणत क्रिकेटपटूनं मारहाण केली, असा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
भारतीदासन पुडुचेरी क्रिकटर्स संघटनेनं फेटाळले आरोप
या प्रकरणात भारतीदासन पुडुचेरी क्रिकटर्स संघटनेचे अध्यक्ष सेंथिल कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ते ( प्रशिक्षक वेंकटरमण) आधीही अनेकदा वादांत अडकले आहेत. त्यांचे खेळाडूंसोबतची वागणूक चांगली नसते. चंद्रनशी त्यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्वाचा राग काढण्यासाठी आरोप करत आहेत, असे सांगत सेंथिल यांनी आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे.