Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cricket is Back : वेस्ट इंडिजचा संघ ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल!

कोरोनाच्या संकटात होणारी पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:42 IST

Open in App

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे मागील अडीच महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धांना ब्रेक लागला होता. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. या मालिकेला जाण्यापूर्वी विंडीजच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी मँचेस्टर येथे दाखल झाला. त्यानंतर जैव-सुरक्षित वातावरणात हे खेळाडू राहणार असून त्यानंतर तीन आठवडे सराव करणार आहेत. 8 जुलैपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8, 16 आणि 24 जुलैला क्रिकेट सामने होणार आहेत.  या दौऱ्यासाठी विंडीजनं 14 सदस्यीय संघ जाहीर केला. डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल आणि शिमरोन हेटमायर यांनी इंग्लंड दौऱ्यावर येण्यास नकार दिल्याचे विंडीज बोर्डानं सांगितले. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखील विंडीज संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांनी सांगितले की,''सर्व खेळाडू आणि स्टाफच्या सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.'' या मालिकेसाठी विंडीज मंडळानं 11राखीव खेळाडूंसह 25 जणांच्या चमूची घोषणा केली आहे. लंडन सरकारच्या नियमानुसार विंडीज खेळाडूंना दोन आठवड्यांच्या आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहेत. पण, या कालावधीत ते सराव करू शकणार आहेत. विंडीज या कालावधीत खेळाडूंची विभागणी करून एक तीन दिवसीय आणि एक चार दिवसीय सामना खेळणार आहेत.

संघ - जेसन होल्डर ( कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रॅथवेट, एस ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, रहकीम डॉवरीच, चेमार होल्डर, शे होप, अल्झारी जोसेफ, रेयमन रेईफर, केमार रोच.

Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!

OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!

Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!

मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय

इशांत शर्मा अडचणीत सापडणार? डॅरेन सॅमीवरील सहा वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल!

टॅग्स :इंग्लंडवेस्ट इंडिज