नवी दिल्लीः क्रिकेटचा देव अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीनं स्वतः सिद्ध करत आहे. भारतीय अंडर-19 संघाचा डावखुरा गोलंदाज अर्जुन इंग्लंडमधल्या एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळत होता. त्यानं वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर सर्वच स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
सरेनं पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्या षटकाची अर्जुनला संधी मिळाली. अर्जुननं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर समोरच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला. फलंदाजाला बचावाची संधी न देता त्यानं फलंदाजाची मधलीच दांडी गुल केली. अर्जुननं हा चेंडू वेगानं टाकला होता. अर्जुन तेंडुलकराच्या या शानदार चेंडूला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडनं शेअर केला आणि तो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला.